Our Client Feedback

सन्माननीय श्री. गजानन कीर्तिकर

खासदार, शिवसेना

सस्नेह,

जय महाराष्ट्र !


गोरेगाव स्थानकाच्या पूर्व बाजूस आपल्या "साईनाथ फ्ल्ऑवर मर्चन्ट" या दुकानातून मागील ४० वर्षाहून अधिक काळ आपण फुले विक्रीचा व्यवसाय अत्यंत यशस्वीरित्या करीत आहात, त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन !


माझ्या घरगुती धार्मिक कार्यक्रमांमध्ये तसेच शिवसेना पक्षाच्या अनेक संघटनात्मक कार्यक्रमांना आपल्या मार्फत पुष्पगुच्छ पुरवण्यात आले तसेच फुलांची आरास देखील उत्तम पद्धतीने करण्यात आली. आपण ग्राहकांचे समाधान करीत असल्यामुळेच ग्राहकांनी देखील आपल्यावर विश्वास दाखवला आहे.


आपला व्यवसाय असाच वृद्धिंगत होत राहो यासाठी मनः पूर्वक शुभेच्छा !

सन्माननीय श्री. सुनिल प्रभु

आमदार , शिवसेना

जय महाराष्ट्र !


गोरेगाव (पू) रेल्वे स्थानकाजवळ आपल्या साईनाथ फ्ल्ऑवर मर्चन्ट या दुकानातून मागील अनेक वर्ष गोरेगावात जनतेसाठी आपण फुले विक्रीचा व्यवसाय यशस्वीपणे करीत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन !


लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करीत असताना अनेक संघटनात्मक व घरगुती कार्यक्रमांत आपण करीत असलेली सजावट तसेच देण्यात येणारे पुष्पगुच्छ यामध्ये कल्पकता व सुंदरता दिसून आली. आपण विश्वासाने करीत असलेल्या या सेवेमुळे येणाऱ्या ग्राहकांचे समाधान होत आहे. आपला व्यवसाय असाच वृद्धिंगत होत राहो यासाठी मनः पूर्वक शुभेच्छा !

सन्माननीय श्री.सुहास कबरे

संस्थापक- अध्यक्ष राजहंस प्रतिष्ठान

सस्नेह नमस्कार,


आपण उभय बंधूंशी माझा गेल्या पंधरा वर्षांपासून परिचय आहे. आमच्या "राजहंस प्रतिष्ठान" या संस्थेच्या माध्यमातून आपण आमच्या संपर्कात आलात. आपण करीत असलेल्या फुलांच्या व्यवसायाची माहिती देणारी वेबसाईट सुरु करीत आहात याचा "राजहंस परिवाराला" सार्थ अभिमान आहे. आपणास हार्दिक शुभेच्छा !


गुणीजनांचा सन्मान करावी ही आपली संस्कृती. राजहंसाच्या व्यासपीठावरून आम्ही अनेक मान्यवरांचा वेळोवेळी सत्कार करीत असतो. त्यासाठी सुंदर व आकर्षक असे हार व पुष्पगुच्छ आपल्या दुकानातून अगदी वेळेवर पोहचवण्यात आले हे येथे आवर्जून सांगावेसे वाटते. अशा रितेने गेली अनेक वर्षे आम्ही आपणाशी जोडले गेलो आहोत, आमच्या कार्यासाठी आपण अनेक वेळा आर्थिक मदत मिळवून दिली आहे. आपणास सामाजिक संस्थांविषयी विशेष आपुलकी आहे याचा आम्हास प्रत्यय या काळात आला आहे. अनेक सामाजिक संस्थेंशी आपले संबंध आहेत, आपण दोघा बंधूंचा हसत मुख चेहरा आणि कामावरची निष्ठा, सचोटी याचे आम्ही चाहते आहोत. एक मराठी यशस्वी व्यावसायिक म्हणून आपला आम्हास अभिमान वाटतो.


भविष्यात आपल्याला भरभरून यश मिळो ही प्रभू चरणी प्रार्थना.